
HSRP Maharashtra Online Registration महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने आदेश जारी केला आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले गेले आहे. महाराष्ट्रातील ज्या वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केली आहे. त्यांनी आता या सूचनांचे पालन करणे आणि त्यांच्या वाहनांवर HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. CMVR च्या नियम आणि मोटार वाहन कायदाच्या कलमा अंतर्गत 1000 /- रुपयांचा दंड टाळण्याकरिता 30 एप्रिल 2025 पर्यंत तुमची HSRP प्लेट बसवून घ्या.
HSRP Maharashtra Online Registration
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ‘ High Security Registration Plates बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे.HSRP Maharashtra Online Registration या लेखात HRSP नंबर प्लेट नेमकी कशी आणि कुठे बनवावी खाली देण्यात आलेली आहे.
How to Apply HSRP Maharashtra Online Registration
जुन्या वाहनावर HSRP ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :
प्रथम www.transpot.maharastra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा. |
या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा) |
ते निवडल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. हे तुम्हाला अधिकृत HSRP प्रक्रियेच्या संकेत स्थळावर घेऊन जाईल (संपूर्ण प्रक्रिया करणाऱ्या संस्थेचे MH नुसार तपशील दिले आहेत.) |
वाहनाशी संबधीत मूलभूत माहिती वाहन, प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सह भरावी. |
HSRP लावण्यासाठी, तुमच्या सोयीनुसार HSRP फीटमेन्ट केंद्र निवडा. |
तुमच्या सोयीनुसार HSRP स्थापित लावण्याची तारीख आणि वेळ निवडा. |
HSRP शुल्क ऑनलाईन भरा. रोख पैसे देण्याची गरज नाही. |
नियुक्त तारीख आणि वेळेवर HSRP फीटमेन्ट केंद्र भेट देऊन तुमचा HSRP लावून घ्या. HSRP Maharashtra Online Registration |
दरम्यान, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने महाराष्ट्रात ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. रोझमां सेफ्टी सिस्टीम लि.’ या कंपनीला हे काम दिले असून https://mhhsrp.com या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत या लिंकवर दहा हजारांहून जास्त अर्ज आले आहेत. जानेवारीपासून नंबरप्लेट बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
नंबर प्लेटसाठीचे शुल्क किती?
दुचाकी, ट्रॅक्टर – 450 /- + GST
तीनचाकी – 500 /- + GST
चारचाकी व अन्य – 745 /- + GST
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || HSRP Maharashtra Online Registration